शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लोककला केंद्रास जिजाऊंचे नाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 01:08 IST

कोल्हापूर : दीक्षांत समारंभासह विविध महत्त्वपूर्ण कार्यक्रम होणाºया शिवाजी विद्यापीठा तील लोककला केंद्रास राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील विविध घटना आणि प्रसंगांची माहिती देणाºया संग्रहालयाची उभारणी विद्यापीठात करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शुक्रवारी येथे करण्यात आली. संघाच्या शिष्टमंडळातर्फे या मागणीचे निवेदन कुलगुरू ...

कोल्हापूर : दीक्षांत समारंभासह विविध महत्त्वपूर्ण कार्यक्रम होणाºया शिवाजी विद्यापीठातील लोककला केंद्रास राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील विविध घटना आणि प्रसंगांची माहिती देणाºया संग्रहालयाची उभारणी विद्यापीठात करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शुक्रवारी येथे करण्यात आली. संघाच्या शिष्टमंडळातर्फे या मागणीचे निवेदन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना देण्यात आले.शिष्टमंडळाच्यावतीने संघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी मागणीच्या अनुषंगाने माहिती दिली. विद्यापीठातील लोककला केंद्रास राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे, या मागणीचे निवेदन यापूर्वीही दोन वेळा विद्यापीठ प्रशासनाला दिले आहे; परंतु अद्यापही विद्यापीठस्तरावर नाव देण्याबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे आता पुन्हा जिजाऊ जयंतीदिनी निवेदन देत आहोत. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने विद्यापीठ विभूषित झाले आहे. जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची योग्य प्रकारे जडणघडण करीत स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली. त्या जिजाऊ माँसाहेब यांच्या स्मृती शिवाजी विद्यापीठात जतन झाल्या पाहिजेत. त्यामुळे या लोककला केंद्रास त्यांचे नाव देण्यात यावे. त्यासह शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे पुतळे विद्यापीठाच्या आवारात उभारण्यात यावेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आणि प्रसंगांची माहिती देणाºया संग्रहालयाची उभारणी करावी यासाठी येत्या अधिसभेमध्ये ठराव मंजूर करावेत, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. शिष्टमंडळाने निवेदन दिले त्यावेळी विद्यापीठाचे उपकुलसचिव व्ही. एन. शिंदे उपस्थित होते. संघाच्या शिष्टमंडळात इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, बबनराव रानगे, शशिकांत पाटील, प्रकाश पाटील, शिरीष जाधव, शरद साळुंखे, सुजित खामकर, अवधूत पाटील, बयाजी शेळके, बाबूराव बोडके, अजिंक्य पाटील, प्रसाद पाटील, डी. आर. बुडके, आदींचा समावेश होता.लवकरच संग्रहालयशिष्टमंडळाने केलेल्या मागणीबाबत कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, नाव बदलण्याचा पूर्ण अधिकार मंडळास आहे. अधिकार मंडळाच्या निवडणुका होऊन सदस्य निवडले गेले असले तरी अजून पूर्ण अधिकार मंडळ निवडलेले नाही. मार्चमध्ये पूर्ण अधिकार मंडळ अस्तित्वात येईल. त्यावेळी हा प्रस्ताव मांडण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संग्रहालयाच्या इमारतीचे काम पूर्णत्वास गेले आहे. लवकरच हे संग्रहालय अस्तित्वात येणार आहे.